Accident NewsLatest NewsMaharashtra
सोनू सूदच्या पत्नी सोनालीचा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतकार्यासाठी अनेकदा चर्चेत असतो. पण यावेळी त्याच्या कुटुंबाकडून एक वाईट बातमी समोर येत आहे. अचानक सोनू सूदवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्याची पत्नी सोनाली सूद हिचा भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात मुंबई नागपूर महामार्गावर घडला. ही बातमी समोर येताच अभिनेत्याचे सर्व चाहते काळजीत आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सोनू सूदची पत्नी सोनालीच्या कारला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ती तिची बहिणी आणि भाच्यासोबत प्रवास करत होती. तेव्हा अचानक त्याच्या गाडीला अपघात झाला. सध्या त्यांच्यावर नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोनू सूदची पत्नीही यात जखमी झाली आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाही. या घटनेचे फोटो समोर आले अशून गाडीचाही चक्काचूर झाला आहे.