सोलापूर विद्यापीठात आयोजित प्रेरणा शिबीरात अमरावती विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट

अमरावती :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे 17 ते 21 मार्च दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्रेरणा शिबीरात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जय उकरडे, तन्मय देव, समर्थ पाठक, गौरव यशकर, प्रणव डोंगरदीवे, आशु भुजबळ, पुनम पखाली, दिपाली ठाकरे, मानसी आसटकर, श्रेया गायगोले या दहा विद्याथ्र्यांसह डॉ. अनिता धुर्वे यांची सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रेरणा शिबीर हे प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी एक विशेष शिबीर असते, ज्यात विद्याथ्र्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याचं काम केल्या जाते. यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात, त्यामुळे विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. सांस्कृतिक कार्यक्रम, श्रमदान व इतर सर्वांगीण बाबींचा विचार करता अमरावती विद्यापीठाच्या चमुला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून गौरविण्यात आले. तसेच डॉ. अनिता धुर्वे यांना सर्वोत्कृष्ट महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कृत करण्यात आले. तर कु. दिपाली ठाकरे हिला सर्वोत्कृष्ट कविता वाचन, उत्कृष्ट सहभाग अशा चार पुरस्काराने गौरवण्यात आले. या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, डॉ. निलेश कडू यांनी अभिनंदन केले आहे.