अमरावती महानगरपालिका, अमरावती लोकसेवा हक्क संबंधीत कामकाज हाताळने बाबत मनपा अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण
अमरावती :- सर्व कार्यालयातील कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याकरीता राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांकरीता ७ कलम कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी कार्यवाही करावयाची आहे. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता मा.डॉ. नरुकुल्ला रामबाबू आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती व महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे उपस्थितीत आज दिनांक २६ मार्च,२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी मा.डॉ. नरुकुल्ला रामबाबू आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती यांचे रोप देवून स्वागत केले.
यावेळी राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभागाचे कक्ष अधिकारी देवेंद्र चव्हाण यांनी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत लोकसेवा हक्क आयोगाची कार्यपध्दती व आयोगामार्फत विविध कार्ययोजनांचे अंमलबजावणी व पुरविण्यात येणारे विविध सेवांची माहिती व त्या अनुषंगाने करावयाचे कार्यवाही इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी लोकसेवापूर्ततेविषयी विविध प्रश्न विचारुन लोकसेवा पूर्ततेच्या कार्यवाहीची सखोल माहिती जाणून घेतली.
सदर प्रशिक्षणात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता संबंधीतांना निर्देशित करण्यात आले.या प्रशिक्षणात विविध विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ज्या सेवा अधिसुचित केलेल्या आहेत, त्या सेवांची ऑनलाईन व ऑफलाईन बाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी मा.डॉ. नरुकुल्ला रामबाबू आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, अमरावती यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्जा बाबत माहिती देण्यात आली.यावेळी मा.आयुक्त डॉ.नरुकुल्ला रामबाबू यांनी मनपाचे सदर अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करून निर्देश दिले की, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी. या अधिनियमान्वये शहरातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.
लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा डॅशबोर्डवर आलेल्या अर्जाची पडताळणी करावी. सेवा हमी कायद्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी असेही निर्देश यावेळी मा.डॉ. नरुकुल्ला रामबाबू आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग यांनी दिले.
लोकसेवा हक्क अधिनियमान्वये सेवा देणाऱ्यांची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात यावी. त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेमधील ५० लोकसेवा सद्यस्थितीत ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या जात असून त्यामध्ये वाढ करीत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याविषयी तत्पर कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या हस्ते कक्ष अधिकारी देवेंद्र चव्हाण यांचे शाल व रोप देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्याम वाघाडे, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण, पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंन्द्रे, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, सहाय्यक निवडणुक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता नितीन बोबडे, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.