अमरावती मेडिकल कॉलेजसाठी कृषी विद्यापीठाची जागा योग्य? आ. संजय खोडके यांची आक्रमक मागणी

अमरावती :- अमरावतीच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजसाठी कृषी विद्यापीठाच्या जागेचा पर्याय – आ. संजय खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले! त्यांच्या मते, कृषी विद्यापीठ परिसरात मेडिकल कॉलेज उभारले गेले, तर १३ तालुक्यांतील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवणं होईल अधिक सुलभ. काय आहे हा मुद्दा?
जाणून घेऊया सविस्तर :
अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याच्या प्रस्तावावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत कृषी विद्यापीठ परिसरात मेडिकल कॉलेज उभारण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी विद्यापीठाच्या जागेवर मेडिकल कॉलेज बांधल्यास अमरावती शहराच्या २ किलोमीटर अंतरावरच नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळू शकतील. विशेषतः १३ तालुक्यांतील रुग्णांसाठी हे कॉलेज एक वरदान ठरेल.
मात्र, काही आमदार आपल्या मतदारसंघात मेडिकल कॉलेज उभारण्याचा आग्रह धरत असल्याने हा प्रस्ताव दुरडला जात असल्याचा आरोप खोडके यांनी केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘एक आमदाराच्या हट्टामुळे हजारो नागरिकांना अडचण सहन करावी लागू शकते.
त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत करावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. या समितीमार्फत जागेची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जावा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
आता यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिक, आरोग्य तज्ञ आणि राजकीय नेते या मुद्द्यावर आपले मत मांडत आहेत. आगामी काळात हा विषय अधिक गाजण्याची शक्यता आहे.
अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज उभारणीबाबतचा हा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. आमदार संजय खोडके यांच्या मागणीनंतर आता सरकारकडून समिती गठीत होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजसोबत राहा!