अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती :- विक्रम सिम्हपुरी विद्यापीठ, नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे 04 ते 08 मे, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा ऋत्विक कुडवे, आकाश सोळंके व अजय कुडवे, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीचा ओम सोळंके व अनुज दातीर, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा रोहण शेळके व रोहण पोटे, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा अनिकेत यादव व रोहण थोपडे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा अनिकेत चोरे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा चेतन माने, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा प्रथमेश थोरकर व अजय मळेकर, बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळचा तन्मय पुरके, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचा कुणाल लोणारे, युवाशक्ती कला व विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा करण सुपेकर, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा प्रज्वल जोगदंडे, भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगांवचा सर्वेश इंझळकर, तक्षशिला महाविद्यालय, अमरावतीचा सौरभ गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश गोंडाणे व जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरचा प्रणव देंडव यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 21 ते 30 एप्रिल दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.