नागपूरच्या पारडी परिसरात भीषण आग! गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीजला मोठे नुकसान

नागपूर :- नागपूरच्या पारडी परिसरात असलेल्या गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. कारखान्याचे प्लास्टिक आणि ज्यूटसारखे ज्वलनशील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन विभागाच्या विलंबावर कारखाना मालकांनी गंभीर आरोप केले आहेत.
संपूर्ण माहिती जाणून घेऊया :
२५ मार्चच्या रात्री पारडी परिसरात भीषण आग लागली. गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज या दोन कारखान्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्लास्टिक, ज्यूट आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. कारखाना मालक गुलशन राहेचा आणि त्यांच्या पत्नी संगीता राहेचा यांनी आरोप केला की, अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर ४५ मिनिटे यायला उशीर झाला. यामुळे आग आणखी भडकली आणि नुकसान वाढले.
आग विझवण्यासाठी युद्ध स्तरावर १० ते १२ अग्निशमन वाहनांची मदत घेण्यात आली. स्थानिकांनी देखील पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अग्निशमन विभागाच्या विलंब आणि यंत्रणांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आग नेमकी कशामुळे लागली आणि कुणाची चूक होती, याचा तपास सुरु आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी पाहत राहा City News.