नागपूर: घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या विधिसंघर्षित बालकांचा पर्दाफाश

नागपूर :- नागपूर शहरातील कळमना परिसरात वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र, कळमना पोलिसांनी जलदगतीने तपास करत विधिसंघर्षित बालकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.4 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली.
या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेऊया :
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घरफोडी आणि वाहन चोरीचे तब्बल 5 गुन्हे घडले.स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि चौकशीदरम्यान विधिसंघर्षित बालक गुन्ह्यात सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. कळमना डिबी पोलिसांनी तत्काळ इतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपास केला. अखेर पोलिसांनी 4 विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. यावेळी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा 4 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
3 घरफोडी आणि 2 वाहन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ही संपूर्ण कारवाई झोन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशाने करण्यात आली. एसीपी विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वी झाली. डिबी पोलीस रविकुमार साहू, मंगेश लोहि, संतोष पांडे, प्रदीप पवार आणि संदीप ढाले यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.कळमना पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतर्कता दाखवत ही कारवाई केली असून, आरोपींवर पुढील कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
कळमना पोलिसांनी जलदगतीने केलेल्या तपासामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. विधिसंघर्षित बालक गुन्ह्यात का गुंतले? त्यांच्या मागे कोण आहे? याची चौकशी पुढे सुरूच राहणार आहे.यासंबंधीच्या पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News.