बिहारमधील रेल्वे स्थानकावर धक्कादायक गोळीबार; बाप-लेकीची हत्या, तरुणीने केली आत्महत्या

बिहार :- बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील नवादा पोलीस स्थानकावर परिसरातील आरा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील पादचारी पुलावर अचानक गोळीबार झाला, स्थानकावर एकच गोंधळ उडाला. एका सशस्त्र तरुणाने या पादचारी पुलावर मुलीसह दोघांवर गोळ्या झाडल्या. रेल्वे स्थानकातील या पादचारी पुलावर दोघांची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
नेमकं घडलं काय?
तरुणाने गोळीबार केलेले दोघेजण आणि हा तरुण असे तिघेही जण जागीच मृत्युमुखी पडले. मुलगी तिच्या वडिलांसोबत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जात असताना त्या तरुणाने बापलेकीवर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळता पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमन कुमारने आधी अनिल सिंग आणि त्यांची मुलगी आयुषी कुमारी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या तरुणानेही तिथेच त्याच बंदुकीतून स्वत:वर गोळी चालवत आत्महत्या केली.
मरण पावलेली मुलगी 16 वर्षांची
मरण पावलेली तरुणी ही 16 ते 17 वर्षांची आहे. तर गोळीबार करणारा तरुण हा 22 ते 24 वर्षांचा असल्याचं सांगितलं जात आहे. ही मुलगी दिल्लीला जात असतानाच तरुणाने तिच्याबरोबरच तिच्या वडिलांची हत्या केली. हा सारा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेनंतर एएसपी, नवादा पोलिस स्टेशन आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.