मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश! डॉक्टरसह चौघे निलंबित | आरोग्यमंत्र्यांचा दणका

मेळघाट :- आरोग्यमंत्र्यांचा दणका! कामचुकारपणा अंगलट – मेळघाटातील हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि तीन कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई !आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या दौऱ्यानंतर उघडकीस आलेला हा धक्कादायक प्रकार. आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांची आता खैर नाही!
पाहूया, हा संपूर्ण प्रकार सविस्तर :
मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला मोठा हादरा! हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरसह तीन कर्मचारी आठवड्यातून फक्त एकदाच हजेरी लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी स्वतः या रुग्णालयाला अचानक भेट दिली असता आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा पर्दाफाश झाला. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नसल्याचे उघडकीस आले, आणि यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली. कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरसह चार कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.आरोग्यमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आता सरकार आक्रमक पावले उचलणार असल्याचे संकेतही दिले आहेत.