विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.ए. (संस्कृत) सेमि-1 (एन.ई.पी.) व्याकरण व्ही भाषाविज्ञानची फेरपरीक्षा 3 एप्रिल रोजी होणार विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी – 2024 एम.ए. (संस्कृत) सेमि.-1 (एऩ.ई.पी.) व्याकरण व्ही भाषाविज्ञान या अभ्यासक्रम/विषयाच्या विद्याथ्र्यांची परीक्षा केंद्र क्र. 103 वरील फेरपरीक्षा विद्यापीठ प्राधिकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार त्याच केंद्रावर दि. 3 एप्रिल, 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.