विद्यापीठात ‘संत गाडगे बाबांची दशसूत्रे व ग्रामविकास’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे 28 मार्च रोजी आयोजन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 28 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘संत गाडगे बाबांची दशसूत्रे व ग्रामविकास’ या विषयावर विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल रिसर्च सेंटर सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
सकाळी 10.30 वाजता कार्यशाळेकरीता नोंदणी सुरु होईल. सकाळी 11.30 वाजता अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटीयार यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न होईल. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड.. निलेश हेलांेडे पाटील, जिल्हा परिषद, अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्रा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.व्ही.एम. मेटकर, डॉ. विद्या शर्मा व सामाजिक न्याय विभाग, अमरावतीच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती माया केदार उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात ‘केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामपंचायतीकरीता असलेल्या विविध योजनेसंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची भूमिका’ या विषयावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावतीच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रिती देशमुख, ‘ग्रामपंचायतीच्या अडचणी व अपेक्षा’ या विषयावर विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावतीचे उपायुक्त (आस्थापना) श्री संतोष कवडे व उपायुक्त (विकास) श्री राजीव फडके हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. दुपारी 3.30 वाजता समारोपीय सत्रात विविध ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची चित्रफित, सरपंचांचे मनोगत, तसेच उपस्थितांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
तरी आयोजित कार्यशाळेला जास्तीजास्त संख्यने संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. दिलीप काळे व महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना, अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन बोंडे यांनी केले आहे.