विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जन आक्रोश धरणे आंदोलन | राज्य सरकारकडे मागण्यांचा पाढा

अमरावती :- राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी लढा – अमरावतीत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी एक दिवसीय जन आक्रोश धरणे आंदोलन केले. शासनाने अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
पाहूया, या आंदोलनाचा संपूर्ण आढावा :
राज्यातील विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राज्यातील 20%, 40% आणि 60% टक्के अनुदानित शाळांना शासनाने संपूर्ण अनुदान द्यावे, अशी जोरदार मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीने केली आहे. मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करण्यात यावा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला असला, तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ताण निर्माण झाला आहे. जर सरकारने तातडीने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि तो वंचित राहू नये, यासाठी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन लढा देत आहेत. राज्य शासन यावर कसा निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा City News!