शोले स्टाईल आंदोलन! पाणीटंचाईने हैराण ग्रामस्थांची थेट टाकीवर चढून मागणी

अमरावती, अचलपूर :- पाणी म्हणजे जीवन, पण जेव्हा तेच पाणी मिळत नाही, तेव्हा ग्रामस्थ काय करतात? खांबोरा विभागातील पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे. 73 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असतानाही, पंधरा-वीस दिवसांआड पाणीपुरवठा होतो. गावकऱ्यांची पाणीविना भटकंती आणि प्रशासनाच्या अनास्थेचा थेट आढावा घेऊया.
खांबोरा विभागातील पाणीटंचाई आता भयावह स्तरावर पोहोचली आहे. योजनेवर 73 कोटी रुपये खर्च करूनही, 15-20 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिली, परंतु समस्येवर कोणतेही ठोस उपाय झाले नाहीत.
या संतापाच्या भरात खारपणपट्ट्याच्या बारूला विभागातील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. ग्रामस्थ थेट पाण्याच्या टाकीवर चढले आणि ‘शोले’ चित्रपटाच्या वीरू स्टाईलने सरकारला धडा शिकवण्याचा इशारा दिला. आंदोलकांची मागणी आहे की, किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा. आंदोलकांची मागणी आहे की, किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा.
ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी यावेळी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे – मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल. प्रशासनाने आता या समस्येवर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.