10 वर्षांपासून फरार आरोपी अखेर गजाआड | धारणी पोलिसांची मोठी कारवाई

धारणी :- दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!धारणी पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे 2015 पासून फरार असलेला अपहार आणि फसवणुकीचा आरोपी गजाआड!कोण आहे हा आरोपी? आणि पोलिसांनी कसा लावला त्याचा छडा?
सविस्तर माहिती घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये :
धारणी पोलिसांची मोठी कारवाई!
दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 2015 मध्ये दुनि येथील पोस्टमास्टर पदावर असताना आरोपीने ताब्यातील मुद्रांक आणि नगदी रक्कम असा तब्बल ₹2,73,000 चा अपहार केला होता. या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आणि पोलिसांना चकवा देत पुणे आणि मुंबईत वास्तव्यास होता. मात्र, धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. सतीश झाल्टे, अनंत हंकारे, नितीन बोरसिया, मोहित आकाशे, जगत तेलगोटे आणि रितेश देशमुख यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला अखेर अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कारवाई सुरू आहे.