आचार्य पदवी (पेट – 2025) प्रवेश परीक्षेसाठी विद्यापीठाकडून आवेदनपत्र आमंत्रित

अमरावती :- विद्यापीठाव्दारे आचार्य पदवीकरिता संशोधन करु इच्छिणा-या संशोधक विद्याथ्र्यांची आचार्य पदवीपूर्व परीक्षा विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. ज्या विद्याथ्र्यांना आचार्य पदवीसाठी संशोधन करावयाचे आहे, त्यांना आचार्य पदवीपूर्व (पेट – 2025) परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज दि. 01 ते 15 एप्रिल, 2025 या कालावधीत सादर करता येतील.
ज्या विद्याथ्र्यांना अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांना विद्यापीठाची वेबसाईट https://www.sgbau.ac.in वरील ‘न्यूज अॅन्ड अनाऊंसमेंट’ यावरील ऑनलाईन सÐव्हस या ठिकाणी जावून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येतील. अर्ज सादर करण्याकरिता आवश्यक संपूर्ण माहिती विद्याथ्र्यांना https://sgbau.formsubmit.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ती माहिती वाचून अर्ज सादर करावेत. परीक्षेसंदर्भामध्ये आवश्यक माहिती वेळोवेळी त्या पोर्टलवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा
आचार्य पदवी (पेट – 2025) परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या पाचही जिल्ह्रांतील निवडक परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली जाणार असून त्याबाबतची तारीख लवकरच विद्यापीठाव्दारे घोषित करण्यात येईल.
सर्वसंबंधित विद्याथ्र्यांनी आचार्य पदवी (पेट – 2025) परीक्षेकरिता विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले असून काही अडचण असल्यास सौ. मीनल मालधुरे, उपकुलसचिव, आचार्य कक्ष यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.