नागपुरमध्ये खळबळजनक खून प्रकरण : गुन्हे शाखा युनिट क्र. 04 ची जलद कारवाई, तीन आरोपी ताब्यात

नागपुर :- नागपुर शहरात ईमामवाडा परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. 04 च्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर :
ईमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील 24 वर्षीय महिलेची आरोपी निलेश मेश्राम याच्याशी 2016-17 मध्ये ट्युशन क्लासेसदरम्यान ओळख झाली होती. प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे आरोपीने महिलेच्या वडिलांना धमकी देण्यासह मारहाण केली होती.
25 मार्च रोजी महिलेच्या घरी गाडीची तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. यानंतर, 26 मार्च रोजी दुपारी 3 वाजता जाटतरोडी चौकात पानठेल्यावर बसलेल्या महिलेच्या वडिलांवर आरोपी निलेश मेश्राम आणि त्याचे साथीदार ईश्वर सोमकुंवर आणि अक्षय सावळे यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट क्र. 04 चे पथक तत्काळ सक्रिय झालं. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तीन तासांत मौदा, नागपूर येथून आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पुढील तपास ईमामवाडा पोलीस करत आहेत.
नागपुर शहरात पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे तीन तासांत आरोपींना गजाआड करण्यात यश आलं. नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.