नोटांचा हार घालून महिला सरपंचाचं आंदोलन | भ्रष्टाचाराविरोधात थेट इशारा

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात एक आगळीवेगळी लढाई लढली जातेय. इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषदेसमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलं. त्यांचा आरोप आहे की अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत.
पाहूया सविस्तर रिपोर्ट :
नांदेड तालुक्यातील इंजेगावच्या सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी आपल्या गावातील विविध विकासकामांसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत की जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम मार्गी लावत नाहीत.
या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलं. त्यांचा हा अनोखा निषेध लक्ष वेधून घेणारा ठरला.
मुक्ताई पंचलिंगे यांचे म्हणणे आहे :
सरपंच म्हणून गावातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण अधिकारी आणि कर्मचारी काम करण्याऐवजी लाच मागतात. अनेकदा अर्ज आणि विनंत्या करूनही काहीच उपयोग होत नाही. यामुळे आम्हाला हा पाऊल उचलावं लागलं.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुक्ताई पंचलिंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ते देखील जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, जिल्हा परिषद प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना योग्य चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या या महिला सरपंचाची लढाई प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
मुक्ताई पंचलिंगे यांनी घेतलेलं हे पाऊल भ्रष्टाचाराविरोधातील एक सशक्त आवाज आहे. पण आता खरा प्रश्न असा आहे की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेईल का? की हे आंदोलनही इतर अनेक आंदोलनांसारखं दुर्लक्षित राहील? याची पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News.