पारडी पोलिसांच्या कारवाईत 30 तासात घरफोडीतील आरोपींना पकडले

नागपूर :- नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणात, पोलिसांनी 30 तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी रवींद्र टेकचंद चौधरी यांच्या घरातून नगदी रक्कम आणि सोने चांदीचे आभूषण चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती.
आणखी माहिती पाहुया या रिपोर्ट मध्ये :
या प्रकरणी फिर्यादी रवींद्र टेकचंद चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली होती की, अज्ञात चोरट्यांनी त्यांचं घर फोडून नगदी रक्कम आणि सोने-चांदीचे आभूषण चोरीला घेतले. ही घटना पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती.
पारडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि 30 तासांच्या आत गुप्त माहिती मिळवून आरोपी आकाश नितेश चाचरकर आणि एक विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतलं.
आरोपी आकाश कडून पोलिसांनी 1 लाख 66 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर, तीन विधिसंघर्षित बालकांनाही या चोरीत सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पारडी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास करून आरोपींचा पर्दाफाश केला आणि पुढील कारवाई सुरू आहे.
पारडी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपींना चक्रे फिरवून 30 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे, आणि 1 लाख 66 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू असून, सिटी न्यूज त्यावर लक्ष ठेवून आहे. आणखी ताज्या अपडेटसाठी, कृपया आमच्यासोबत राहा. धन्यवाद!