वणी: रसोई हॉटेलला भीषण आग – लाखो रुपयांचे नुकसान
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात एक भयावह घटना घडली आहे. साई मंदिर परिसरातील रसोई हॉटेलला भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेचा सविस्तर आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये :
वणी शहरातील साई मंदिर परिसरातील रसोई हॉटेलला आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले आणि हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे समजताच तेथील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले. पाण्याचा मारा करून त्यांनी आग आटोक्यात आणली.या दुर्घटनेत हॉटेलमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेलमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि किचनमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. पोलिस तपास सुरू असून घटनेचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैव म्हणावे लागेल. हॉटेलमधील कर्मचारी आणि इतर नागरिक सुरक्षित आहेत.