सामाजिक वनीकरण घोटाळा? दगडागड-बळेगावमध्ये 2000 झाडांपैकी फक्त 800 शिल्लक
अमरावती, भातकुली :- भातकुली तालुक्यात सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली झाडं ऑक्सिजनवर असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. शासनाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम राबवला, मात्र दगडागड आणि बळेगाव इ क्लास क्षेत्रात हे झाडं वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट :
भातकुली तालुक्यातील दगडागड आणि बळेगाव इ क्लास क्षेत्रात सामाजिक वनीकरण अंतर्गत 2022-23 मध्ये एकूण १000 झाडांची लागवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त ४00 झाडं अस्तित्वात असल्याचं समोर आलं आहे. पाण्याचा अभाव, देखभालीची कमतरता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही झाडं ऑक्सिजनवर असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मजूर काम करताना दिसलेले नाहीत. पाणी देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ही झाडं वाळत चालली आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. योजनेला पांढरा हत्ती दाखवला जात आहे,” असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ योजनेला यामुळे मोठा धक्का बसला असून, यावर सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.
सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली लावलेली झाडं जिवंत राहण्याऐवजी वाळत चालली आहेत. प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव यामुळे ही पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News.