अकोला जिल्ह्यात अंत्री मलकापूर येथे एक दिवसीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन

अकोला :- आपल्या पवित्र संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि मंदिरांची सुरक्षा, स्वायत्तता आणि योग्य देखरेखीची आवश्यकता लक्षात घेऊन, आज अकोला जिल्ह्यातील अंत्री मलकापूर येथे एक अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मंदिरे सरकारने भक्तांच्या स्वाधीन करावे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे’ आणि ‘हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आणि रक्षणासाठी देव निधीचा वापर करावा’ या प्रमुख उद्देशाने हा अधिवेशन आयोजित करण्यात आलेला आहे.
आजच्या या अधिवेशनात जिल्हाभरातील सुमारे 425 मठ – मंदिर विश्वस्त आणि पुजारी एकत्र आले आहेत, जे आपापल्या मंदिरांच्या हक्कांच्या रक्षणासाठी एकत्र येऊन, आवाज उठवणार आहेत.
आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. मंदिरांच्या सुरक्षेसाठी, ट्रस्टच्या जागांचा बचाव, तसेच हिंदू धर्माच्या प्रचार आणि रक्षणासाठी देव निधीचा योग्य वापर या सर्व बाबींवर आमच्या सर्वांचे एकमत झालं.
समस्या आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आपली एकजुट आणि सक्रियतेची गरज आहे. म्हणून, आपल्या मंदिरांची सुरक्षा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकत्र येणे हे अत्यंत आवश्यक आहे.