अकोल्यात इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी; पोलिसांनी आरोपीला अटक करून लाखो रुपयांचे एसी आणि फ्रिज जप्त केले
अकोला :- अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील गोडाऊनमधून एसी आणि फ्रिज चोरीला गेले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीकडून लाखो रुपयांचे एसी आणि फ्रिज जप्त केले आहेत. या चोरीच्या घटनेच्या तपासाची सुरुवात केली असून, पुढील तपास सुरू आहे
अकोला शहरात उन्हाळ्याच्या दिवसात एसी आणि फ्रिजची मागणी जास्त असताना, चोरट्यांनी एक मोठी चोरी केली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊनमधून सहा एसी आणि चार फ्रिज चोरी झाले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीच्या मालमत्तांची जप्ती केली.
याप्रकरणी अटक केलीय. मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ अस या चोरट्याचे नाव असून या आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले एसी आणि फ्रिज जप्त केले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. इतर चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.