अमरावती जिल्ह्याला 784 कोटींचे अनुदान! विकास कामांना वेग | पालकमंत्री बावनकुळे

अमरावती :- अमरावती जिल्ह्यात विकासाची गती वाढणार! पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या 784 कोटी रुपयांच्या अनुदानामुळे आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि सीसीटीव्ही यासह विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार आहेत. त्याचबरोबर, टीबी मुक्त अमरावती साठी 100% अभियान राबवले जाणार असून, परतवाडा-अमरावती मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
पाहुया सविस्तर रिपोर्ट :
अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे. 784 कोटींच्या अनुदानातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा टीबी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. City News कडून आम्ही यशस्वी प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News.