गो. से. महाविद्यालयात नासकॉम कौशल्य विकास कार्यक्रमाच्या पदवी प्रदान समारंभाचे भव्य आयोजन
खामगाव :- सारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे नासकॉम एम्प्लॉयबिलिटी आणि स्किलिंग प्रोग्रॅमच्या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमांची आणि कौशल्य विकासातील यशाची पोचपावती देण्यात आली.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, नासकॉम फाउंडेशन दिल्लीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंकिता राजोरा, हेड हेल्ड हाय फाउंडेशन बेंगळुरूचे असोसिएट डायरेक्टर राघवेंद्र पी. वाय., श्रीमती सुरजदेवी रामचंद्र मोहोता महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत डोंगरे आणि हेड हेल्ड हाय फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक सुमित धानोरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख वक्त्यांनी कौशल्य विकासाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधींबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या आयजी ग्रुपचे अभिषेक बन्सल आणि प्रशिक्षक अशोक रामनानी यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त सल्ले दिले. यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डी. एन. व्यास व इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अक्षद शर्मा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल भामद्रे यांनी व्यक्त केले. समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्यामुळे हा प्रसंग प्रेरणादायी ठरला. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.