AmravatiLatest News
पालकमंत्री बावनकुळे यांची राणा दांपत्याला सांत्वना भेट | श्रद्धांजली अर्पण

अमरावती :- माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री स्वर्गीय राजिंदर कौर हरभजन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर, अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गंगा सावित्री निवास स्थानी भेट देत राणा दांपत्याला सांत्वना दिली. या वेळी स्व. राजिंदर कौर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
अशा कठीण प्रसंगात राणा कुटुंबाला बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. सिटी न्यूजच्या वतीनेही आम्ही स्व. राजिंदर कौर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.