AmravatiLatest News
पालकमंत्री बावनकुळे यांचा भव्य जनसंवाद | हजारो नागरिकांच्या समस्या ऐकल्या

अमरावती :- अमरावती जिल्ह्याच्या जनतेसाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ऐतिहासिक जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला. आज सकाळपासून अमरावती नियोजन भवनात नागरिकांचा जनसागर उसळला. हजारो नागरिक आपल्या अडचणी आणि समस्या घेऊन मंत्री महोदयांसमोर हजर झाले. दिव्यांग बांधवांपासून तर महिलांपर्यंत, प्रत्येकाने आपल्या मनातील व्यथा मांडली.
अनेक समस्यांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जनसंवादाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना थेट आपल्या मागण्या मांडण्याची संधी मिळाली. सिटी न्यूजच्या वतीने, आम्ही जनतेच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुढील अपडेटसाठी जोडलेले रहा City News सोबत. जय महाराष्ट्र!