मोर्शी शहरातील कोट्यावधी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे !
अमरावती, मोर्शी :- राज्य शासनाने मोर्शी शहर विकासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत मोर्शी नगर परिषदेला रस्ते बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामध्ये प्रभाग क्र. ९ मधील अमरावती अप्रोच रोड ( परशुराम मंगल कार्यालय) ते सुधाकर माकोडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाकरीता 4 कोटी 52 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून मात्र, नगर परिषदेमार्फत करण्यात येत असलेली सर्व कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. संबंधीत कंत्राटदाराच्या व नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आपला मुठीत घेऊन तारेवरची कसरत करून घराच्या बाहेर पडावे लागत आहे. मागील ४ महिन्यांपासून संपूर्ण रोड खोदून ठेवलेला असून संबधित कंत्राटदार या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत असून या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर पाणी सुद्धा टाकले जात नसेल तर कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम सुरू असणाऱ्या रस्त्याचा दर्जा कसा असेल याकडे नगर परिषदेच्या बांधकाम विभाग अटी व शर्तींना डावलून सदर निधीचा संबंधीत कंत्राटदारालाच फायदा व्हावा म्हणून नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप अंकुश घारड यांनी केला असून सदर रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करून व जे कामे करण्यात आलेली आहेत. त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व ही चौकशी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गुणवता व नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्याची मागणी अंकुश घारड यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संबंधीत कंत्राटदाराच्या व नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आपला मुठीत घेऊन तारेवरची कसरत करून घराच्या बाहेर पडावे लागत आहे. मागील ४ महिन्यांपासून संपूर्ण रोड खोदून ठेवलेला असून संबधित कंत्राटदार या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत असून या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर पाणी सुद्धा टाकले जात नसेल तर कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम सुरू असणाऱ्या रस्त्याचा दर्जा कसा असेल याकडे नगर परिषदेच्या बांधकाम विभाग अटी व शर्तींना डावलून सदर निधीचा संबंधीत कंत्राटदारालाच फायदा व्हावा म्हणून नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप अंकुश घारड यांनी केला आहे.