यवतमाळमध्ये रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळला, करणी सेनेचा जोरदार विरोध
यवतमाळ :- महाराणा सांगा यांच्याबद्दल खासदार रामजीलाल सुमन यांनी केलेल्या विवादित वक्तव्यामुळे महाराष्ट्रभरात गदारोळ माजला आहे. यवतमाळमधील दत्त चौकात करणी सेनेने रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळून आपला विरोध व्यक्त केला. याप्रसंगी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सुमन यांचे वक्तव्य आणि त्याविरोधातील या आंदोलनाची सविस्तर माहिती आता.
आग्राच्या खासदार रामजीलाल सुमन यांच्या महाराणा सांगा यांच्याबद्दलच्या विवादित वक्तव्यावर महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. यवतमाळमध्ये करणी सेनेने रामजीलाल सुमन यांच्या पुतळ्याला चपलीचे हार अर्पण करीत विरोध प्रदर्शन केले. यावेळी भर चौकात सुमन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्याम सिंह ठाकुर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
महाराष्ट्रात करणी सेनेच्या या कडक प्रतिक्रियेनंतर रामजीलाल सुमन यांचे वादग्रस्त वक्तव्य किती पटींमध्ये आणखी गाजणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, इतर नेत्यांची या बाबतीत काय प्रतिक्रिया येते यावर लक्ष ठेवले जाईल. सिटी न्यूजच्या माध्यमातून अशीच महत्वाची अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्याबरोबर राहा.