विद्यापीठात विदेशातील शिक्षणाच्या संधी विषयावर सेमिनार संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचा उपक्रम

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग आणि मायबाप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विदेशातील शिक्षणाच्या संधी’ विषयावर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न झाला. विदेशातील उच्च शिक्षणाच्या सुविधा व संधी यावर स्टडी अॅडव्हायझर डॉट कॉमचे संचालक आकाश मेश्राम यांनी विदर्भातील विद्यार्थी विदेशांमध्ये उच्च शिक्षण कसा घेऊ शकेल, त्यासाठी कोणत्या पात्रता आहेत व त्या कशा निर्माण कराव्यात, विदेशात कोणकोणत्या ठिकाणी उच्च शिक्षणाचा खर्च आणि शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होणा-या नोक-या, पगार आदीचे स्वरूप अशा सर्वच विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पूज्य भदंते बुध्दप्रिय, महाबोधी फाउंडेशनचे अध्यक्ष भदंते भिक्खू सिलवंश अलंकारा, सचिव श्री सुबोध भुसारे, श्री गौतम वानखेडे मंचावर उपस्थित होते.
महाबोधी फाउंडेशनचे अध्यक्ष भदंते भिक्खू सिलवंश अलंकारा यांनी मनोगत व्यक्त करतांना विदेशातील शिक्षणामुळे विद्याथ्र्यांच्या अंतरंगातील गुण विकसित होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे कार्यक्रम फाऊंडेशनच्यावतीने केले जात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशिल खोब्रागडे यांनी, सूत्रसंचालन प्रा. सुरेश पवार तर आभार डॉ. पवन तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. वामन गवई प्रा. अरुण रौराळे, प्रा. रामचंद्र वरघट, प्रा. राहुल मेश्राम, डॉ. अरुणा पाटील, डॉ. श्रीकांत बनसोड, प्रा. मनीषा लाकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन बनसोड, सचिव आदिनाथ अंभोरे, कु. नीलिमा गाडे, अनुराधा तायडे, विनोद खकासे, डॉ. संतोष खंडारे, श्री. बापुराव वानखेडे, अनिल वानखेडे तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थी, अमरावती शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.