बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास!

अकोला :- अकोला जिल्ह्यातून एक घृणास्पद आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवलं. पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने पूर्ण केली. न्यायालयाने सरकार पक्षाचे ६ साक्षीदार तपासले आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे.
समाजासाठी कठोर संदेश
या घटनेने पुन्हा एकदा समाजातील नैतिकता आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
न्यायालयाने दिलेला हा निकाल अशा नराधमांना कठोर संदेश देणारा आहे, जो आपल्या नात्यांची पवित्रता विसरून अशा घृणास्पद कृत्यांमध्ये लिप्त होतात.