पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा, 8 वर्षांनी दीक्षाभूमीला दिली भेट

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळपासून मोदींचा नागपूर दौरा सुरु झाला असून ते दिवसभरात विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. रविवारी मोदींच स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. नागपूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी 8 वर्षांनी दीक्षाभूमीला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमी स्थळी दाखल झाले आणि यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी स्मारकाच्या आतमध्ये असलेल्या गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला मोदींनी अभिवादन केले. तसेच दीक्षाभूमीच्या पवित्र स्तूपांमध्ये बुद्ध वंदना केली. यापूर्वी 2017 रोजी नरेंद्र मोदी नागपूरच्या दीक्षाभूमीला आले होते. 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती त्यानंतर आठ वर्षानंतर मोदीजी दीक्षाभूमीवर आले.