LIVE STREAM

BollywoodLatest News

Sikandar Twitter Review : सलमान खानची एन्ट्री पाहताच थिएटरचं झालं स्टेडियममध्ये रुपांतर; तिकिट बूक करण्या आधी वाचा रिव्ह्यू

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. या चित्रपटाला पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी थिएटरमधील व्हिडीओ शेअर केले आहेत. चला तर जाणून घेऊया नेटकरी काय म्हणाले…

सिकंदर हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. त्याचं दिग्दर्शन एआर मुरुगादॉस यांनी केलं आहे. त्यांनी या आधी आमिर खानच्या गजनी या चित्रपटाचं दिग्दर्शनं केलं होतं. तर प्रेक्षकांच्या त्यांच्या या सिकंदर या चित्रपटाविषयी काय प्रतिक्रिया आहे. त्याकडे एकदा पाहुया…

एका नेटकऱ्यानं म्हटलं की ‘त्यानं हा चित्रपट लंडनमध्ये पाहिला आणि हा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपट पाहताना खूप मज्जा आली. डायलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटाला खूप चांगलं बॅकग्राऊंड म्यूजिक दिलं आहे आणि खूप सुंदर प्लॉट आहे. अप्रतिम कास्ट आणि एकंदरीत सगळंच चांगलं आहे. चित्रपट पाहायला खूप मज्जा आली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सिकंदरनं सलमान खानच्या इतर चित्रपटांना मागे टाकलं आहे. त्याची एन्ट्री ही जबरदस्त होती. यात अ‍ॅक्शन, भावना आणि गाणी सुद्धा खूप चांगली आहेत.’
https://twitter.com/i/status/1906153288971768179

एका नेटकऱ्यानं आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानची एन्ट्री पाहिल्यानंतर थिएटरमध्ये असलेले सगळेच वेडे झाले. थिएटर जणू काही स्टेडियम असल्याचं जाणवलं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानची आतापर्यंतची सगळ्यात उत्तम एन्ट्री. एक था टायगर नंतर जर त्याची कोणत्या चित्रपटात जबरदस्ती एन्ट्री असेल तर तो हा चित्रपट आहे. सिकंदर सर्वोत्तम चित्रपट आहे. बजरंगी भाईजान किंवा सुलतानपेक्षा पण खूप चांगली एन्ट्री होती. ही एन्ट्री पाहून माझ्या पण डोळ्यात अश्रू आले. खूप भावूक झालो आणि अंगावर शहारे आले.’
https://twitter.com/i/status/1906174474203840530

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!