LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

धाराशिवमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खरंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध आहे का? पोलिसांचा मोठा खुलासा

बीड: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच धाराशिवमध्ये एका महिलेचा मतृदेह सापडला. या मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध असल्याचा दावा सोशल मिडियावर करण्यात आला. धाराशिवमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खरचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध आहे का? याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी मनीषा बिडवे या महिलेचा घरात मृतदेह आढळून आला होता. ही महिला कळंब शहरातील एका कॉलनीमध्ये एकटीच राहत होती. घराच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेजारी व पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता या महिलेचा घरात मृतदेह आढळून आला. ही महिला बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागच्या अनेक वर्षापासून ती कळंब शहरात राहते आहे. या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा काही पोस्ट बीड जिल्ह्यामध्ये समाज माध्यमावर झळकल्या होत्या.

पोलिसांनी या अनुषंगाने तसा तपास देखील केला मात्र या महिलेचा या घटनेची काही एक संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितला आहे. या महिलेच्या मृतदेहाचं शव विच्छेदन करण्यात आलं असून त्याचा अहवाल अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही आत्महत्या की हत्या होती हे स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची किंवा या घटनेशी या महिलेचा काही एक संबंध नाही असं कळंब पोलिसांचं म्हणणं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट केली असून या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संबंध असल्याचं सुचित केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या धाराशिवमधील महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं धाराशिव पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!