पत्नीने नवऱ्याला 2 पुरुषांबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; दाराजवळ रक्ताचे डाग अन् बॉक्स बेडमध्ये…

दिल्ली: पूर्व दिल्लीमध्ये एका महिलेचा मृतदेह बेडमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी महिला ज्या घरात राहत होती त्या घराचा मालक आणि अन्य एका व्यक्तीला रविवारी अटक केली आहे. पोलिसांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मृत महिलेच्या पतीच्या सहकाऱ्याचाही समावेश आहे. महिलेचा पती फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बॉक्स बेडमध्ये सापडला मृतदेह
महिलाचा मृतदेह बॉक्स बेडमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणामध्ये घरमालक विवेकानंद मिश्राला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. कबुली देताना मिश्राने त्याच्यासोबत या महिलेची हत्या करण्याच्या कटात दोन अन्य व्यक्ती सहभागी होत्या असही सांगितलं आहे. मयत महिलेच्या पतीबरोबरच या हत्याकांडामध्ये अभय कुमार नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचं मिश्राने सांगितलं.
घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार
विवेक विहार येथील डीडीए येथील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली. या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दुर्गंधी येत असलेल्या घराला टाळा असल्याचं दिसून आलं. पोलिसांना घराच्या मागच्या दाराजवळ रक्ताचे डाग दिसून आले. पोलिसांना दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांना एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलेली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बॉक्स बेडमध्ये सापडला.
पतीला दोन पुरुषांबद्दल नको त्या अवस्थेत पाहिलं
त्याच रात्री पोलिसांनी 65 वर्षीय घरमालक विवेकानंद मिश्राला आनंद विहार येथील सुरजमल पार्क येथून ताब्यात घेतलं. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासादरम्यान मयत महिला 35 वर्षांची असून तिचं नाव अंजली असं असल्याचं समजलं. अंजलीने तिच्या पतीला दोन पुरुषांबरोबर दिल्लीतील फ्लॅटवर नको त्या अवस्थेत रंगेहात फकडलं. पतीच्या समलैंगिक संबंधांबद्दल समजल्यानंतर अंजली तिच्या माहेरी म्हणजेच पंजामधील लुधियानाला निघून गेली.
पत्नीला परत बोलावलं अन्…
21 मार्च रोजी तिचा पती आशिषने तिला पुन्हा घरी येण्यासाठी राजी केलं. दोन दिवसांनी आशिषने घरमालक आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील बॉक्स बेडमध्ये लपवलं. त्यानंतर आशिष जयपूरला आपल्या चुलत भावाकडे राहायला गेला. घरमालक दिल्लीला परतला. आशिष आणि त्याचा मित्र अभय हे दोघे बिहारला पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून आशिष अजून फरार आहे. सध्या पोलीस आशिषचा शोध घेत आहेत.