LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

बीडच्या तुरुंगात 2 गटात राडा; वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण?

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यानंतर आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी यासाठी विरोधकांसह सर्व स्तरातून मागणी होऊ लागली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली. पण तुरुंगात या आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती आहे.बीड जेलमध्ये दोघांना कैद्यांकडून मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महादेव गित्ते, अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं समजतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान याच कारागृहात बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवलेदेखील आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे.त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी ही याच जिल्हा कारागरामध्ये असून त्याच कारागृहामध्ये आहेत. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा करागरामध्ये आहे. आरोपी वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असल्याचे समोर येत आहे. दरम्यान ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.

बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येतंय. हा वाद कशामुळे घडला? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याची माहिती समोर येतीये. वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचं आयकार्ड होतं.. सोशल मीडियावर त्याचं हे आयकार्ड व्हायरल झालंय. या आयकार्डमध्ये तो फिल्म प्रोडक्शन कंपनीचा आजीव सभासद असल्याची नोंद आहे. बीकेसीमध्ये कराडचं ऑफिस असल्याचा दावाही निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलाय.

कृष्णा आंधळे फरार
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 111दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीए.कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय. आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!