बीड: पूर्व वैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

बीड : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कान्हापूर येथे पूर्वीच्या वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याचा संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी हत्या केली. यानंतर आरोपींनी स्वतःहून शिरसाळा पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
मार्च 2023 मध्ये स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर स्वप्निलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्निलने वारंवार अविनाश यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. यामुळे संतोष आणि सोनाली देशमुख यांनी तणावाखाली हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
हत्येनंतर आरोपींनी स्वप्निलचा चेहरा दगडाने ठेचला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत संतोष देशमुख, सोनाली देशमुख आणि राजेभाऊ देशमुख यांना अटक केली असून, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
या दोन्ही घटनांमुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.