Crime NewsLatest News
लातूर: अनैतिक संबंधातून व्यक्तीचा निर्घृण खून

लातूर : लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे अनैतिक संबंधांमधून निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शरद प्रल्हाद इंगळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मारेकऱ्यांनी डोक्यात कोयता आणि कत्तीने वार करून त्याचा जीव घेतला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शरद इंगळे याचे करकट्टा येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे पळून गेले होते, मात्र समजूत काढून त्यांना परत आणण्यात आले. यानंतर महिलेसोबतच्या वादातून तिच्या पतीने मुलांसह मिळून शरद याचा खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर इंगळे कुटुंबीयांनी मुरुड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.