LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

Sambhajinagar Crime : प्रेमाचा करुण अंत! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याची आत्महत्या

संभाजीनगर :- संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील कातपूर येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवनाथ जगधने (३०) आणि शितल दोडवे-उघडे (२८) या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पॅरोलवर सुटलेला नवनाथ आणि शितलचा निर्णय

नवनाथ जगधने हा पूर्वीचा गुन्हेगार होता आणि ६ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सध्या तो एका महिन्याच्या पॅरोलवर बाहेर आला होता. २८ मार्चला त्याला पुन्हा तुरुंगात हजर होण्यासाठी जायचे होते. मात्र, त्याआधीच शितल आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलिस तपासात असे आढळले की, दोघांनी घराच्या टेरेसवर जाऊन गोचीड मारण्याचे विष प्राशन केले.

भूतकाळातील धक्कादायक घटना

महत्वाचे म्हणजे, नवनाथने ज्या ६ वर्षांच्या मुलाची हत्या केली होती, तो मुलगा शितलचाच होता. शितलचा विवाह २०१८ मध्ये अंबडमधील एका तरुणाशी झाला होता. मात्र, २०२० मध्ये नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असता, त्याने तिच्या मुलाची हत्या केली. यानंतर पोलिसांनी शितल आणि नवनाथविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तपासादरम्यान शितल निर्दोष सुटली, तर नवनाथला जन्मठेपेची शिक्षा झाली.

आत्महत्येने उडाली खळबळ

शितल गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती. पॅरोलवर सुटून आलेला नवनाथ तिच्या घरी गेला आणि तिथेच दोघांनी विष घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!