Nagpur Police : नागपूरच्या नंदनवनमध्ये पोलिसांचा रूट मार्च – सुरक्षा अधिक कडेकोट!
नागपूर :- रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच वक्फ बोर्डाच्या निर्णय आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढून परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जय भीम चौक येथून रूट मार्चला प्रारंभ केला. कुंभारडोली, शास्त्रीनगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्र नगर, नीलम पान पॅलेस, वृंदावन नगर, हसनबाग, दर्शन कॉलनी, जामा बडी मज्जित, हसनबाग कब्रस्तान, विज्ञान चौक या भागांत पोलिसांनी पायी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला.
रूट मार्चमध्ये सहभागी अधिकारी आणि कर्मचारी :
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी
- सहाय्यक पोलीस आयुक्त
- 20 पोलीस कर्मचारी (15 पुरुष, 5 महिला)
- पीटर मोबाईल, CR मोबाईल, पेट्रोल मोबाईल
- दोन बीट मार्शल
- SRPF च्या 21 जवानांचा समावेश
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. यावेळी नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.