विद्यार्थी विकास संचालक पदावर डॉ. राजीव बोरकर यांची पुनर्नियुक्ती

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक पदावर डॉ. राजीव बोरकर यांची तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा, 2016 मधील कलम 23(क)(1) नुसार त्यांची नामनिर्देशित नियुक्ती जाहीर केली आहे.
डॉ. राजीव बोरकर यांचा संचालक, विद्यार्थी विकास या पदावरील तीन वर्षांचा कार्यकाल 31 मार्च 2025 रोजी पूर्ण झाला होता. तथापि, कुलगुरूंनी आपल्या अधिकारांतर्गत त्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियुक्तीमुळे ते 2028 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
विद्यार्थी विकास विभाग हा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा घटक आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. डॉ. राजीव बोरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थी विकास विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले असून, यापुढेही तेच धोरण कायम ठेवले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विद्यार्थी व शैक्षणिक वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात आहे.