AMC Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या शहर उपजीविका कृती आराखड्यासाठी आवाहन

अमरावती :- अमरावती महानगरपालिका अंतर्गत “शहर उपजीविका कृती आराखडा” तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील गरिबी निर्मूलन करणे आणि वंचित घटकांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे. यासाठी विविध उपाययोजना, सेवा सुधारणा, आणि रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
टास्क फोर्स समिती आणि कामगार गट:
अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत शहर उपजीविका टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या कार्यक्षेत्रात खालील व्यवसायिक दृष्ट्या वंचित घटकांचा समावेश आहे:
- बांधकाम कामगार – गवंडी कामगार, इलेक्ट्रिक कामगार, पेंटर, सेंट्रिंग कामगार, प्लंबर, इ.
- वाहतूक कामगार – रिक्षा, टेम्पो, ट्रकचालक आणि संबंधित कर्मचारी.
- घरगुती कामगार – स्वयंपाक, घरकाम करणारे, इ.
- वैयक्तिक सेवा कामगार – लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घेणारे.
- गिग कामगार – झोमॅटो, स्विगी आणि कुरिअर कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कामगार.
- स्वच्छता कामगार – घनकचरा व्यवस्थापन, नाला सफाई, रस्ते स्वच्छता करणारे कर्मचारी.
- इतर वंचित व्यवसाय गट – हॉटेल, दुकान, कारखाने व इतर ठिकाणी काम करणारे मजूर.
NGO व सामाजिक संस्थांसाठी आवाहन:
वरील कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था (NGO) व सामाजिक संघटनांना विनंती करण्यात येते की, या वंचित घटकांचे सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नव्या उपाययोजना आणि उपक्रमांवर आपली मते मांडावीत.
तुमच्या सहभागामुळे शहरातील वंचित घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल तसेच अमरावतीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
संपर्क करा:
सहभागासाठी अमरावती महानगरपालिकेच्या राजापेठ येथील NULM विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा श्री. ठाकरे (मोबाइल क्रमांक – 9552597337) यांच्याशी संपर्क साधावा.