Gold Rate : सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, ग्राहकांमध्ये चिंता; पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गुढीपाडव्यानंतरही सोन्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या लग्नसराई सुरू असल्याने बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परिणामी आजही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात वाढ
Good Returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच ३ एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 540 रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,35,300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर:
- १ ग्रॅम: 8,575 रुपये
- ८ ग्रॅम: 68,600 रुपये
- १० ग्रॅम (१ तोळा): 85,750 रुपये
- १०० ग्रॅम: 8,57,500 रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर:
- १ ग्रॅम: 9,353 रुपये
- ८ ग्रॅम: 74,824 रुपये
- १० ग्रॅम: 93,530 रुपये
- १०० ग्रॅम: 9,35,300 रुपये
राज्यातील विविध शहरांतील सोन्याचे दर:
शहर | 22 कॅरेट (1 ग्रॅम) | 24 कॅरेट (1 ग्रॅम) |
---|---|---|
अमरावती | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
नागपूर | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
मुंबई | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
पुणे | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
जळगाव | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
सोलापूर | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
छत्रपती संभाजी नगर | 8,560 रुपये | 9,338 रुपये |
ग्राहकांमध्ये चिंता वाढली
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत असली तरी वाढत्या किंमतीमुळे अनेक ग्राहक प्रतीक्षा करत आहेत.
सोन्याच्या किंमती पुढील काळात कमी होतील की आणखी वाढतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमच्या पोर्टलला भेट द्या.