Weather Update : अमरावतीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह संततधार!

अमरावती :- अमरावती शहर आणि परिसरात आज सकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी १० वाजताच्या सुमारास हवामानात मोठा बदल झाला आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची संततधार सुरू झाली. काही वेळातच शहरात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
हवामान विभागाने गुरुवारीच अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला होता आणि अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंता वाढवणारा ठरू शकतो.
शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस धोक्याचा इशारा!
अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः भुईमूग, तीळ, कांदा आणि संत्रा पिके या पावसामुळे प्रभावित होऊ शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिवसभर विजेच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शहरात गारवा, परंतु वाहतुकीवर परिणाम
या अवकाळी पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हवामान विभागाचा पुढील अंदाज:
- अमरावती जिल्ह्यात आणखी काही तास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
- विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात.
- नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
सिटी न्यूजच्या पुढील हवामान अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा!