AmravatiLatest News
अमरावतीत न्यायधीश निवासस्थानी चंदन चोरीचा पर्दाफाश! पोलिसांच्या कारवाईत मोठा मास्टरमाइंड गजाआड

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील न्यायधीश निवासस्थानी चंदन झाड चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यातील कुख्यात चंदन चोर टोळीच्या प्रमुखाला अटक केली. पोलिसांनी जालना जिल्ह्यातून सुरुवात करत वेषांतरात आरोपींची माहिती गोळा केली आणि अंबाई बाजार तसेच अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चंदन चोरीसह इतर अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.
पत्रकार परिषदेत माहिती: पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, चंदन चोर टोळीचा म्होरक्या आणि त्याचे साथीदार ताब्यात असून, ही कारवाई शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. पोलिस विभाग यापुढेही अशा गुन्ह्यांवर कठोर नजर ठेवून कार्यरत राहील.