AmravatiLatest News
अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! ५९७ किलो गांजा जाळला

अमरावती : अमरावती शहरात पोलिसांनी गांजा कारवाई आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. ४ एप्रिल रोजी नागपूर बुटीबोरी एमआयडीसी येथे पोलिसांनी ५९७ किलो गांजा जाळून नष्ट केला, ज्याची किंमत १ कोटी १९ लाख ४० हजार रुपये आहे. याशिवाय, प्रिया टॉकीज जवळ मोबाईल कर्मचाऱ्याकडील २ लाख ७५ हजार रुपयांची लूट आणि एसआरपी वसाहतीतील दरोड्याच्या प्रकरणातही पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पत्रकार परिषदेत माहिती:
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या कारवायांमुळे पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे. अशा कडक कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन सुनिश्चित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.