अमरावती महानगरपालिका, अमरावती आमदारांनी घेतला नगर रचना विभागाचा आढावा
अमरावती: मा.आमदार संजय खोडके, मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ४ एप्रिल,२०२५ रोजी नगर रचना विभागाचा आढावा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी मा.आमदार संजय खोडके व मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी आमदारांनी महानगरपालिकेमध्ये खाली भुखंड, डीपी रोड, शासकीय व खाजगी जागेवर आरक्षणाबाबत, मालमत्ता कर, ले-आऊट, नाली व रस्त्याचे बांधकाम, बांधकाम परवानगी बाबत या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन संबंधीतांना निर्देशित करण्यात आले. नविन लेआऊट ची मंजुरी देत असतांना लेआऊट मध्ये संबंधीतांनी पाहणी करुन नाली बांधकाम करत असतांना वाहते पाणी साचणार नाही याचे नियोजन व्यवस्थीपणे करावे असे निर्देश आमदार महोदयांनी दिले. सदर काम गतीमान व दर्जेदार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. नागरीकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. सदर काम हे अतिशय महत्त्वाचे असून ते त्वरीत पूर्ण करावे असे यावेळी त्यांनी सांगितले. येणा-या अडचणी त्वरीत सोडवून सदर काम पूर्णत्वास त्वरीत न्यावे. सदर कामाची गती आहे त्यापेक्षा अधिक करुन नागरीकांना दिलासा द्यावा असे यावेळी आमदार महोदयांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्याम वाघाडे, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.