घरफोडीचा गुन्हा उघडकीस | सराईत चोर संतोष राजपूतला पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपूर: नागपूर शहरात पुन्हा एकदा घरफोडीचा सत्र! मात्र पोलिसांनी केलेल्या तत्परतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन बेलतरोडी अंतर्गत अप.क्र. 127/2025 अन्वये कलम 331(4), 305 भारतीय न्याय संहितेनुसार दाखल घरफोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. पोलिसांनी मिळवलेल्या गोपनीय माहितीनुसार, संतोष सुरेश राजपूत वय ४५ वर्ष, रा. रामटेके नगर, अजनी, याला सिताफिने ताब्यात घेण्यात आले.संतोष राजपूत हा घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांत सामील असलेला सराईत आरोपी आहे. नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्याचा क्राइम चार्ट मिळवला असून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना BC Message पाठवण्यात आला आहे. गुन्हा घडलेल्या ठिकाणचे CCTV फुटेज तपासल्यानंतर आरोपीचे ओळख पटली. विशेष म्हणजे हा आरोपी फक्त दोन महिन्यांपूर्वीच चंद्रपूर कारागृहातून सुटून बाहेर आला होता, आणि पुन्हा घरफोडीच्या मार्गावर लागला.आरोपीकडून चोरीस गेलेला महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर कारवाई ही मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ०४ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.