नागपूरमध्ये भाजीच्या वादातून थेट फायरिंग – सोहेल खानचा निर्घृण खून!
“नागपूर: “नागपूरच्या शांततामय वातावरणात खळबळ उडवणारी घटना – भाजीच्या ठेल्याच्या वादातून थेट फायरिंग आणि खून! सहा जणांच्या टोळीने रात्रभर दहशत माजवली आणि एकाचा जीव घेतला. आता तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून हा वाद भाजीचे ठेले लावण्याच्या कारणावरून निर्माण झाला, असा धक्कादायक खुलासा पोलीस उपायुक्त राहुल मदणे यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नागपूरच्या मानकापूर हद्दीत गोविंद लॉनजवळ फायरिंग आणि खूनाची थरारक घटना! भाजीच्या ठेल्यावरून वाद निर्माण झाला आणि सहा जणांच्या टोळीने फायरिंगसह चाकू-सत्तूरने सोहेल खानचा खून केला. बाळू मांजरेसह तिघे अटकेत, पोलिसांचा तपास वेगात.
२ अग्नीशस्त्र, चाकू व सत्तूर पोलिसांनी जप्त केले असून, मृतक सोबत असलेल्या मित्राच्या गळ्यालाही गोळी लागली होती. सुदैवाने तो वाचला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्य आरोपी बाळू मांजरे यासह तिघांना अटक करण्यात आली आहे, तर तिघे अजूनही फरार आहेत.
“गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. मात्र नागपूर शहरात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणं गरजेचं आहे.