महानगरपालिकेत पिंक महिला कक्षाचे उदघाटन संपन्न
अमरावती: राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसाचा आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका अंतर्गत रोखपाल विभाग येथे पिंक महिला कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षाचे उदघाटन शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल,२०२५ रोजी मा.आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याकरीता सदर कक्षास महिलांच्या प्राप्त होणा-या तक्रारी घेण्याकरीता श्रीमती सविता पाटील वरिष्ठ लिपीक यांची नेमणूक करण्यात आली. या कक्षेद्वारे महिलांकरीता माहिती, समस्याचे निराकरण, मदत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर महिलांना सुचना व सल्ला दिल्या जाईल व तक्रारी नोंदविल्या जाईल.
यावेळी महानगरपालिकेतील महिला कर्मचारी व बाहेरील काही कामानिमित्य येणा-या महिलांच्या ज्या समस्या आहे त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदर महिलांनी मनपातील पिंक महिला कक्षांशी संपर्क साधावा.
या उदघाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त दिपीका गायकवाड, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, जितेंद्र भिसडे रोखपाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, ज्योती पारडशिंगे, अश्विनी लोंदे, कल्पना मावदे, पद्मा पवार, रंगा धुर्वे, राजकुमारी चव्हाण, शुभांगी कनेर, श्रध्दा बिसने, संगीता बोरवार उपस्थित होते.