राज्य परिवहन विभागाच्या भंगार बसेस: प्रवाशांचे वाढते त्रास आणि प्रशासनाचा दुर्लक्ष

अमरावती : राज्य परिवहन विभागाच्या बसेसच्या स्थितीवर एक चिंताजनक सवाल उपस्थित होतोय. राज्य परिवहन विभागाच्या भंगार बसेस अनेकदा बंद पडण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आज ५ एप्रिल २०२५ रोजी, पवनी वरून निघालेली बस, MH 40N8999, अमरावती येथील गर्ल हायस्कूल चौक येथे अचानक बंद पडली. प्रशासन आणि राज्य परिवहन विभागाचे लक्ष यावर का नाही?”
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बंद पडल्यावर बसचालकाने सांगितले की, एरलॉक झाल्यामुळे बस बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना केवळ आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यासाठीच नाही, तर त्यांना अपघात आणि इतर आपत्तींमुळे देखील संकटाचा सामना करावा लागला. या बसच्या बंद पडण्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि असंतोष निर्माण झाला. सध्या, भाडे मात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, मात्र प्रवाशांना सेवा मिळत नाही.
सर्वप्रथम प्रश्न असा आहे की, या भंगार बसेस रस्त्यावर धावत का आहेत? प्रशासन किती वेळा याकडे लक्ष देईल? नागरिकांची आणि प्रवाशांची सुरक्षा कधी सुनिश्चित केली जाईल?”
आजच्या या घटनेने राज्य परिवहन विभागाची कार्यक्षमता आणि व्यवस्थापनाच्या कमतरता पुन्हा एकदा उघड केली आहे. आता पाहणे महत्वाचे ठरते की सरकार आणि प्रशासन यावर किती लक्ष देतात. प्रवाशांचे हक्क आणि सुरक्षिततेची काळजी कधी घेतली जाईल, हे पाहणे आवश्यक आहे.